Sunday, March 29, 2026

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आजरा नगरपंचायतीस कचरा व्यवस्थापन व विकासकामांसाठी निधीची नगरसेवक बामणे व कुंभार यांची मागणी...


आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
आजरा शहरातील वाढत्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक व नगरसेविकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नगरसेवक परशुराम वैजू बामणे, नगरसेविका डॉ. सौ. स्मिता सुधीर कुंभार (परळकर) तसेच डॉ. श्रदानंद ठाकुर, सुधीर कुंभार, अतुल पाटील (अध्यक्ष रवळनाथ कॉलनी), मयूर परळकर व अमोल जाधव तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन आजरा शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले.


आजरा शहराची स्थायी लोकसंख्या सुमारे २४ हजार असून दररोज १४ ते १५ हजारांची तरंगती लोकसंख्या शहरात येत असते. शहराची भौगोलिक रचना गुंतागुंतीची असल्याने कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. नगरपंचायतीकडे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री अपुरी असून, जुन्या कंत्राटाची मुदत संपल्यामुळे नवीन निविदा प्रक्रियेतही अडथळे येत आहेत. परिणामी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायतीस कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेसाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, आजरा नगरपंचायत वार्ड क्र. १५ मधील उर्वरित गटार बांधकाम व रस्त्याच्या कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची  वैयक्तिक मागणी नगरसेवक परशुराम बामणे यांचे कडुन करण्यात आली. पालकमंत्र्यांनी या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्याच बरोबर रस्ते आणि पाणी पुरवठा योजनेबाबत ही चार्चा करणेत आली शहरातील रस्ते आजून पूर्ण का झाले नाहीत असे मंत्री महोदयांनी विचारणा केली. त्या वेळी काही रस्ते आपुर्ण आहेत आणि जे रस्ते झाले आहेत त्या ठिकाणी पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या मधून गेले मुळे त्या ठिकाणी  पाण्याची गळती काढण्यासाठी  सिमेंटचा रस्ता फोडून पाईपची गळती काढावी लागत  असे अन्याय निवारण समितीने पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.  त्यावेळी पालकमंत्री म्हणाले की संबंधितांच्या बरोबर चर्चा  करून सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.
×××××××××××××××××××××

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...