Monday, March 16, 2026

कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन....


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.
      
जिल्हा प्रशासन व पुरवठा विभाग यांच्यामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत असून प्रत्येक वितरकाला संबंधित तालुक्यांतील गॅस एजन्सी आणि ग्राहकांशी नियमित संपर्क ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणत्याही विक्रेत्याकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अत्यावश्यक सेवा जसे की हॉस्पिटल तसेच विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहे यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी घरगुती गॅसचा काळाबाजार, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री होत असल्यास त्याबाबत प्रशासनास कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी आपल्या तक्रारी 0231-2655579 तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 8390732026 या हेल्पलाईन क्रमांकावर नोंदवाव्यात. तसेच संबंधित ठिकाणाचा पत्ता, फोटो किंवा उपलब्ध माहिती या क्रमांकावर पाठवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.  नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
××××××××××××××××××××××××××××××

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...