Thursday, February 19, 2026
‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, भारताच्या इतिहासातील शौर्य आणि संघटन कौशल्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराजाची स्थापना करून त्यांनी न्याय, सत्य आणि सर्व धर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. त्यांची युद्धनीती, दूरदृष्टी आणि सक्षम प्रशासन पद्धती आज हि प्रेरणादायी आहे. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी असलेली त्यांची बांधिलकी आम्हाला प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केली तर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महिला विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर यांनी केले. तर आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी केले. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ संचालक अभिषेक डोंगळे, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.विजय मगरे, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे, गीता मोरे, संभाजी जाधव व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment