Wednesday, February 4, 2026

सहकारी संस्थेतील पदांना न्याय देऊ न शकणारे जिल्हा परिषदेत जाऊन काय करणार : जयवंत सुतार; होणेवाडी येथे भाजपाचा प्रचार दौरा....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क.....
पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी व शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे उमेदवार जिल्हा बँक, साखर कारखाना, तालुका संघ अशा सहकारी संस्थांत संचालक आहेत. मात्र या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनता किंवा सभासद हिताचा कोणताही कारभार केलेला नाही. अशी मंडळी जिल्हा परिषदेत जाऊन काय काम करणार आहेत? याउलट कोणतेही पद नसताना मी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये 40 कोटी हून अधिक रकमेचा विकास निधी आणला आहे. त्यामुळे जनतेने कामाचा माणूस म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केले. ते होनेवाडी येथे आयोजित भाजपच्या प्रचार दौऱ्यात बोलत होते. यावेळी वाटंगी पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार समीर पारदे उपस्थित होते.


सुतार पुढे म्हणाले, विरोधी उमेदवार साखर कारखान्यात संचालक असतानाही शेतकरी व कामगार वाऱ्यावर पडला आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी राहील. प्रत्येक गावात चांगल्या पद्धतीचा विकास करायचा आहे. ही निवडणूक विकासासाठी असल्याने विकास करणाऱ्याच्या पाठीशी सर्वांनी राहावे असेही ते म्हणाले. यावेळी समीर पारदे, कृष्णा सुतार, बळवंत शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संदीप देसाई, सचिन पाटील, प्रियांका आजगेकर, संगीता सुतार, रेश्मा पाटील, तानाजी पाटील, सुनील घेवडे, अरुण पाटील, रघुनाथ कातकर, तातूअण्णा बटकडली, स्वप्नील शेंडे, नारायण कातकर, ईश्वर आजगेकर, गणपत जाधव यांच्यासह महिला युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

भाजपचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघांचे उमेदवार जयवंत सुतार व भाजपच्या कार्यकर्त्यांनी कासार कांडगाव येथे थेट शेताच्या बांधावर जात प्रचार केला.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...