आजरा, विकास न्यूज नेटवर्क....
गेल्या दहा वर्षात केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत आहे. या माध्यमातून भाजपने सर्वसामान्यांसाठी वैयक्तिक हिताच्या तसेच सार्वजनिक हिताच्या अनेक योजना राबवले आहेत. याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होऊन त्यांचे जीवन सुखकर झाले आहे. हा विकासाचा दृष्टिकोन फक्त भारतीय जनता पार्टी कडेच आहे. असा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन भाजपाचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केले. ते उचंगी पैकी हुडे येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करत विजयी करण्याचा निर्धार केला.
जयवंत सुतार पुढे म्हणाले, विविध संस्थातील पदे मिरवण्यासाठी आहेत असे मानणाऱ्यांना बाजूला करा. जनतेसाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा. वाड्या वस्त्यावर निधी पोहोचवण्यात आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. आतापर्यंत जिल्हा परिषद मतदार संघात 40 कोटी हून अधिक रकमेचा निधी दिला आहे. त्यानंतरच मते मागायला आलो आहे. यावेळी वाटंगी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार समीर पारदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संयोगिता बापट, ज्योत्स्ना चराटी, युवराज देसाई, सागर देसाई, वसंत चौगुले, पांडुरंग देसाई, विष्णू देसाई, मनोहर देसाई, नंदकुमार कुपटे, राजेंद्र धडाम, तुकाराम धडाम, अरविंद देसाई, सत्तू धडाम, यशवंत चौगुले यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवर्डे येथील जी. एम. पाटील यांच्या गटाचा भारतीय जनता पार्टीचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पेरणोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी जी. एम. पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment