Sunday, February 1, 2026
भाजपाच्या परोली येथील प्रचार रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कमळाला विजयी करण्याचा निर्धार....
आजरा विकास न्यूज नेटवर्क....
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारात भारतीय जनता पार्टीने आजरा तालुक्यात मोठी आघाडी घेतली आहे. सर्वच गावातील नागरिक भारतीय जनता पार्टीला मोठा प्रतिसाद देताना दिसत आहे. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पेरणोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई यांच्या परोली येथील प्रचार रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकास साधणाऱ्या भाजपाला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.
यावेळी जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार, पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार स्मिता देसाई, बळवंत शिंत्रे, दीपक गवळी, अनिल केरकर, हर्षवर्धन महागावकर, जितेंद्र नांदवडेकर, विश्वास कोडक, उत्तम देसाई, विठ्ठल मस्कर, रोहिदास दारुडकर, अमोल सुतार, दीपक देसाई, विजय सावंत, प्रतीक नेवरेकर, जयवंत सावंत, प्रकाश सावंत, संभाजी नेवरेकर, दत्तात्रय दोरूगडे, मनोहर शिवदणकर, प्रकाश कांबळे, विनायक सरदेसाई, ज्ञानेश्वर डेळेकर, राहुल गावडे, यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment