Thursday, January 1, 2026

कोल्हापूर हादरलं! भरधाव गाडीने घेतले तिघांचे प्राण....!

कोल्हापूर, न्यूज नेटवर्क....
सरत्या वर्षाला निरोप देत देशभरात नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. मात्र कोल्हापुरमध्ये ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव कारने तिघांना चिरडले. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा भयंकर अपघात झाला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास तिघेजण तावडे हॉटेल चौकात शेकोटी करून रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते. त्याच वेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने या तिघांना चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला.
=========================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...