मुंबई, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाचा उसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकातील कारखान्यांबरोबर सीमेलगतच्या कारखान्यांना हंगाम सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाऊ नये म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या हंगामात एकूण 1 हजार 250 लाख टन ऊस उपलब्ध असेल असा अंदाज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री निधीसाठी दरवर्षी घेण्यात येणारे प्रतिटन 5 रुपयांवरुन 15 रुपये करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment