राधानगरी, विकास न्यूज नेटवर्क :
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर (ता. राधानगरी) येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या शुभांरभ सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, ग्रामीण रुग्णालय सोळांकूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती कोले, औषध निर्माण अधिकारी विद्यानंद कोरे, सोळांकूरचे सरपंच राजाराम कांबळे आधी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागामार्फत रुग्णांना चांगल्या व दर्जेदार सुविद्या द्या. आरोग्य सेवा देताना आरोग्य विभागाने खासगी दवाखान्यात देत असलेल्या सेवांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची सेवा द्यावी, रुग्णालयामार्फत रुग्णांना सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात यावी, याबाबत कुठलीही तडजोड होता कामा नये. रुग्णालयात आलेला रुग्ण खासगी रुग्णालयात न जाता आपल्या रुग्णालयात यावा यासाठी आरोग्य विभागाने विविध योजनांची माहिती नागरिकांमार्फत पोहोचवावी. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरु झाली असून या योजनेचा लाभ सोळांकूर पंचक्रोशीतील नागरिकांना होणार असून चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवेबद्दल त्यांनी सर्व टीमचे अभिनंदनही केले.
प्रास्ताविकात सोळंकुर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती कोले यांनी सोळंकुर ग्रामीण रुग्णालयात देत असलेल्या आरोग्य सेवांबाबत तसेच या रुग्णालयात गेल्या 4 महिन्यात 150 विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याबद्दल सादरीकरणाव्दारे माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सोळंकुर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, आशा वर्कर, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच्या धर्तीवर आरोग्य विभागामार्फत उभारणार कॉर्पस फंड
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार घेता येतो. परंतु 5 लाखांवरील उपचारासाठी निधीची कमतरता भासते. त्यासाठी राज्य शासनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षच्या धर्तीवर आरोग्य विभागामार्फत कॉर्पस फंड उभा केला जाणार आहे. या कॉर्पस फंड मधून 5 लाखांवरील आजारांसाठी मदत होणार असून यांचा उपयोग राज्यातील अनेक गरजू रुग्णांना होईल.
=====================
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment