आजरा तालुक्याचे शांत व संयमी नेतृत्व : मुकुंददादा देसाई (वाढदिवस विशेष)
आजरा तालुक्यातील शांत व संयमी नेतृत्व, अजातशत्रू व्यक्तिमत्व, सहकारातील अभ्यासू अशी प्रतिमा असणारे जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचा मंगळवार (दि. 19 नोव्हेंबर) रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने...
- विकास सुतार, आजरा
आजरा तालुक्याचे दिवंगत लोकनेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. बळीराम देसाई यांच्या राजकीय, साामाजिक व सहकार क्षेत्रांतील कार्याचा वसा घेऊन मुकुंददादा देसाई यांची वाटचाल सुरू आहे. जिल्हा बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर स्व. बळीराम देसाई यांच्या पश्चात जनता बँकेची धुरा ताब्यात घेऊन बँकेला मोठा नावलौकिक मिळवून दिला आहे. बँकेच्या कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सभासद व ग्राहक समाधानी कसा राहील, याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेला राज्यस्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बँकेच्या ६० वर्षांच्या इतिहासात २०२३ मध्ये बँकेची निवडणूक बिनविरोध करून नेतृत्वगुणाची चुणूक दाखविली आहे. सहकारात आपल्या कामाचा ठसा मुकुंददादा देसाई हे उमटवत असताना लोकांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काम करत असताना त्यांनी काम केले आहे. तसेच ते आजरा शेतकरी साखर कारखान्यात संचालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या राजकीय क्षेत्रात पक्ष बदलाचे वारे जोरात असताना मुकुंद दादा यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या विचारांवरील निष्ठा कधीही ढळू दिलेली नाही. त्यामुळे ते एकाच पक्षात निष्ठावान म्हणून कार्यरत आहेत. राजकीय, सहकार किंवा कोणत्याही क्षेत्रातील निर्णय घेत असताना शांत व संयमपणा ते नेहमीच दाखवित असतात. त्यामुळे शांत व सयंमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणात कार्यरत असल्यामुळे मुकुंद दादा यांचे अनेकांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी कधीही मनभेद ठेवलेला नाही, त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व अजातशत्रू बनले आहे. विविध पदांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे व्रत अंगी बाणवलेल्या नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा..!
घरीच स्वीकारणार दिवसभर शुभेच्छा.....
जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मुकुंद दादा देसाई यांचा मंगळवार (दि. 19 नोव्हेंबर) रोजी वाढदिवस साजरा होत असतो. देसाई हे दरवर्षी आपला वाढदिवस घरीच साजरा करतात. दरवर्षी त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागलेली असते. दरवर्षीच या दिवशी उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळेच यंदा निवडणुकीची धामधूम असून सुद्धा देसाई हे मंगळवारी दिवसभर आजरा शहरातील महागाव रस्त्यावरील आपल्या घरामध्ये शुभेच्छा स्वीकारतील.
=====================
No comments:
Post a Comment