इंडिया आघाडीला आजऱ्याच्या ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; पश्चिम दक्षिण दुर्गम भागातील ४५ गावांचा संपर्क दौरा पूर्ण
आजरा : वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघतील इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आजरा तालुक्यातील पश्चिम-दक्षिण विभागातील ४५ दुर्गम वाड्यावस्त्यांचा इंडिया आघाडीचा जनसंपर्क दौरा पूर्ण झाला. या दौऱ्याचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाअध्यक्ष मुकुंद देसाई, राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश आपटे, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, गोकुळ संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख युवराज पवार, माजी सभापती उदयराज पवार, अभिषेक शिंपी, नौशाद बुडडेखान, राजू होलम, कॉ. संजय तर्डेकर, संजयभाऊ सावंत, राजू देसाई, वंचित बहुजन आघाडीचे संतोष मासाळे, इंडिया आघाडी समन्वयक रविंद्र भाटले यांनी केले होते.
आजरा तालुक्यातील पेरणोली येथून या दौऱ्याला सुरवात झाली. पश्चिम दक्षिण भागातील ४५ दुर्गम वाड्यावस्त्यांवर मतदारांशी थेट संपर्क साधत गाव बैठका घेऊन इंडिया आघाडीची भूमिका मतदारांपर्यंत पोहाचवण्यावर भर देण्यात आला. या छोट्या बैठकांना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने इंडिया आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे. चितळे धनगरवाडा येथून जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांच्या उपस्थितीत चौथ्या दिवसाच्या दौऱ्याला सुरवात झाली. भावेवाडी, चितळे, जेऊर, चाफवडे, कासारकांडगाव, परोली येथे मतदारांशी थेट संपर्क साधत गावबैठका झाल्या. इंडिया आघाडीचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सावंत, विक्रम देसाई, विलास पाटील, रणजीत देसाई, अशोक पवार, राजू देसाई, संकेत सावंत, उत्तम देसाई, सुरेश कालेकर, प्रकाश मोरुस्कर, युवराज जाधव, जोतीबा चाळके, संतोष पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
======================
No comments:
Post a Comment