शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने आजरा शहरात प्रचार फेरी
आजरा : वृत्तसेवा
इंडिया आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने आजरा शहरात प्रचारफेरी काढण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांना इंडिया आघाडीची भूमिका सांगण्यात आली. तसेच आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी, नगरसेवक किरण कांबळे, संजयभाऊ सावंत, अमित खेडेकर, इम्रान सोनेखान, मंजूर मुजावर, संभाजी पाटील, युवराज पोवार, विक्रमसिंह देसाई , रवी भाटले, कॉ. संपत देसाई , विक्रम पटेकर, ओंकार माद्याळकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी होते.
=============
No comments:
Post a Comment