गारगोटी (प्रतिनिधी) :
कुर (ता. भुदरगड) येथील आकुर्डे मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रम व विक्रमी विकासकामांसाठी पोहच पावती म्हणून इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी न्यु दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय भारत ज्योती गौरव अॅवार्ड जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण्याच्या शानदार कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती, विविध राज्यांचे राज्यपाल व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. हा गौरव सोहळा ९एप्रिल २०२१ रोजी दिल्ली येथे लुढिया गार्डन मध्ये होणार आहे. या पुरस्काराबद्दल जीवन पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment