Sunday, April 11, 2021

कोल्हापूर बिंदूचौक सबजेल मधील ३१ कैदी कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

शनिवारी रात्री कोल्हापूर शहरातील बिंदू चौक सबजेलमधील तब्बल ३१ बंदी कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर तातडीने कारागृहात औषध फवारणी करून सबजेल निर्जंतुकीकरण करण्यात आले. सदर कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांवर कारागृहातच कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे. ५ एप्रिल रोजी या कारागृहातील दोन कैद्याना शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत तपासणीसाठी इचलकरंजीला नेण्यात आले होते. कारागृहात परत येताना त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी एका कैद्याचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील ८२ कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. याचा अहवाल शनिवारी रात्री कारागृह प्रशासनाला प्राप्त झाला. यामध्ये तब्बल ३१ कैद्यांचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संबंधित कोरोना रुग्णांवर कारागृहातच कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...