नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) :
संपूर्ण जगाचे कान जी बातमी ऐकण्यासाठी आसुसलेले होते… अखेर ती आनंदवार्ता आली आहे. करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
No comments:
Post a Comment