Sunday, November 29, 2020

महाविकास आघाडीचे अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : जि. प. सदस्य जीवन पाटील यांचे आवाहन


गारगोटी (प्रतिनिधी) :

पुणे शिक्षक व पदवीधर विभाग मतदार संघाचे महाविकास  आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व अरूण लाड यांना सर्व  पदवीधर व शिक्षक मतदारांनी विजयी करुन आपल्या हक्काचे व आपल्या मागण्या व प्रश्न  विधानसभेत मांडणारे आमदार पाठवुया असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी केले. ते कुर (ता. भुदरगड)  येथे पी. डी. पाटील फौंडेशन सभागृहात  आयोजित केलेल्या पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदे मध्ये बोलत होते. यावेळी पाटील पुढे म्हणाले माझ्या जिल्हा परिषद मतदार संघातील पदवीधर मतदार हा सुज्ञ आहे. तो महाविकास आघाडीलाच मतदान करेल व आपणही प्रा. जयंत आसगावकर व अरुण लाड  यांना मतदार संघातुन  पदवीधर व  शिक्षक वर्गाचे विक्रमी मतदान  देवुन महा विकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहुया असे ते म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पी. डी. पाटील, आण्णासाहेब पाटील, माजी सरपंच अनिल हळदकर, सुरेंद्र धोंगडे, संदिप पाटील, माजी उपसरपंच संतोष कांबळे (टिक्केवाडी), रमेश देसाई आदि उपस्थित होते.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

हरणांची शिंगे कोरीवड्याच्या युवकांकडून जप्त; कोगनोळीजवळ बेळगाव वनविभागाची कारवाई

हरणांची शिंगे कोरीवड्याच्या युवकांकडून जप्त; कोगनोळीजवळ बेळगाव वनविभागाची कारवाई


निपाणी (प्रतिनिधी) :

हरणाची शिंगे विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या कोरीवडे (ता. आजरा) येथील दोन युवकांना बेळगाव पोलीस वनविभागाने कोगनोळी (ता. निपाणी) येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हरणाची शिंगे व कवटी जप्त करण्यात आली आहेत. यामाध्यमातून आंतरराज्य रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. तेजस तानाजी पाटील (वय २४) व तुषार तानाजी पाटील (वय २९ दोघेही रा. कोरीवडे ता. आजरा) अशी संशयितांची नावे आहे. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. कोरीवडे येथील दोघांकडे हरणाच्या शिंगाचा साठा तसेच कवटी आहे. त्याची बेकायदेशीरित्या विक्री केली जाणार असल्याची माहीती बेळगाव वनविभागाच्या भरारी पथकाला मिळाली. यानुसार त्यांनी सापळा रचून कारवाई केली. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Friday, November 27, 2020

शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे एकाचा खून


आजरा (प्रतिनिधी) :

धामणे (ता. आजरा) येथे शेतजमिनीच्या वादातून शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा खून झाला आहे. सावंत कुटुंबियांत जमिनीचा वाद फार वर्षापासुन आहे. त्याबाबत न्यायालयात खटला देखिल चालू आहे. 

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......

Thursday, November 26, 2020

अमेरिकेत करोनाचं तांडव; ४० सेंकदाला एका रूग्णाचा मृत्यू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये करोनानं डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत असून, अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णयही घेतला. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इतर देशांबरोबरच अमेरिकेतील परिस्थितीही पुन्हा एकदा चिंताजनक होताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, प्रत्येक ४० सेंकदाला एका व्यक्तीला जीव गमावावा लागला आहे.

अमेरिकेत करोनाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मागील सहा महिन्यानंतर म्हणजे  मे नंतर पहिल्याच अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत २ हजार १५७ रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासात ४० सेंकदात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.

करोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. मंगळवारी अमेरिकेत १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. करोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १२.६ मिलियन नागरिक करोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ सहा महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत २४ तासांत ३ हजार ३८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Monday, November 23, 2020

महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविड टेस्ट सक्तीची


मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र सरकारने चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे.

राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तिथे करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.

चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही निगेटीव्ही रिपोर्ट सादर करावा लागेल. प्रवाशाच्या ९६ तास आधी हा करोना चाचणी करावी लागेल. रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. “ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील, त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागेल” असे एसओपीमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारने?

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात येण्याच्या ७२ तास आधी हा चाचणी अहवाल घेतला गेला पाहिजे.

आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टचा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल त्यांना विमानतळावर आल्यानंतर ती टेस्ट करावील लागेल. विमानतळांनी यासंदर्भातले टेस्टिंग सेंटर्स उभारले पाहिजेत. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधून जे प्रवासी रेल्वेने येणार आहेत त्यांनाही आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट सोबत आणावा. तो निगेटिव्ह असेल तरच प्रवास करावा आरटीपीसीआर टेस्ट मागील ९६ तासांमध्ये केलेली असली पाहिजे.

राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तिथे करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.
या चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागेल.

अशाच प्रकारची नियमावली रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Sunday, November 22, 2020

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घणाघाती टीका


आजरा (प्रतिनिधी) :

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात  खरपूस समाचार घेतला
       
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.
         
यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई यांची भाषणे झाली. स्वागत संभाजी तांबेकर यांनी केले. प्रास्ताविक आजरा पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी केले.

ते आमचे उमेदवार नव्हेत

मेळाव्याआधी मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवर जनता बँकेच्या सभाग्रहात चहा घेत बसले होते. त्यावेळी हातात पावती घेऊन एक शेतकरी आला आणि मंत्री मुश्रीफ यांना विचारले, 'हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले ते तुमचे उमेदवार आलेत काय? त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनाही क्षणभर काहीच समजेनासे झालले. विषय लक्षात येतात मंत्री मुश्रीफ शेतकऱ्याला म्हणाले,  आमचे उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर आहेत. ते पैसे घेऊन गेलेले आमचे उमेदवार नव्हेत. नंतर या विषयाची ही जोरदार चर्चा सुरू झाली.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Saturday, November 21, 2020

७ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण करून टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय : जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग प्रथम सर्व शिक्षकांची कोविड चाचणी व पूर्व तयारी करून टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय संस्थाचालक, पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. देशातील इतर ठिकाणी दिल्ली, मुंबई, पुणे परिसरात कोवीड रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि नुकत्याच झालेल्या दिवाळी-दसरा सणामुळे लोकांचा एकमेकांशी झालेला संपर्क यामुळे नजिकच्या काळात कोरोना रुग्णांच्या प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती  शाहू सभागृहात संस्थाचालक, पदाधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. या परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते. सहभागी संस्थाचालक आणि पदाधिकारी तसेच प्रतिनिधी यांनी शाळा सुरू करण्याबाबत आपली मते मांडली. 

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, स्थानिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने शाळेची स्वच्छता करावी. ज्या पालकांनी संमतीपत्र दिले आहे आणि १० नोव्हेंबर रेाजीच्या परिपत्रकानुसार संस्थांनी केलेल्या पूर्वतयारीनुसार शाळा सुरू कराव्यात. शिक्षकांनी प्रथम त्यांच्या स्तरावर २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत आरटीपीसीआर चाचणी कोव्हिड केंद्रांवर करून घ्यावी. तालुका पातळीवरही कोव्हिड केंद्रांवर शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास प्राधान्य द्यावे. ज्या शिक्षकांना खासगी प्रयोग शाळांमार्फत कोविड चाचणी करायची असेल त्यांना तशी मुभा राहील. शाळा सुरू करण्याबाबत पालकांचे संमतीपत्र अनिवार्य असावे. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, सर्व शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण झाल्याशिवाय व मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी लेखी संमती दिल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाहीत. यासाठी कालावधी लागणार असल्याने ७ डिसेंबर नंतर शाळा सुरु केल्या तरी त्यास संमती देण्यात आली. परंतु, त्यानंतर टप्याटप्याने योग्य ती खबरदारी व काळजी घेत, जिल्ह्यातील शाळा संस्थाचालकांनी सुरू कराव्यात, असा निर्णय घेण्यात आला. परंतु जो पर्यंत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक आहे. दरम्यानच्या कालावधीत कोरोना संसर्गात वाढ दिसून आली तर या निर्णयात बदल होऊन शाळा सुरु ठेवण्यास स्थगिती देण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Tuesday, November 17, 2020

नव्याने केलेल्या रस्त्याला मधोमध भगदाड; आजरा तालुक्यातील प्रकार, कोट्यावधी रूपये पाण्यात


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुक्यातील गडहिंग्लज मार्गापासून हाजगोळी मार्गे पेद्रेवाडी रस्ता काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावरील हाजगोळी बंधार्‍यानजिकचा रस्ता २०१९ च्या पावसाळ्यात वाहून गेला. त्यातच आता या बंधार्‍यावरील दुसर्‍या बाजूला मधोमधच भगडाद पडले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील खर्च केलेला कोट्यावधीचा निधी यामुळे पाण्यात गेला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या स्ट्रक्चर अॉडीटचे मागणी करणार्‍या लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेल्या रस्ताचा दर्जा सुमार झाल्याने लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावी अशी मागणी होत आहे. 


हाजगोळी पेद्रवाडी हा पाच किलोमीटरचा रस्ता साडेतीन कोटी रुपये खर्चून काही महिन्यापूर्वी करण्यात आला. हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आला. हा रस्ता केल्यापासूनच या रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करित होते. त्यातच २०१९ च्या पावसाळ्यात हाजगोळी बंधार्‍यानजिकचा २०० मीटरचा रस्ता वाहून गेला होता. यामुळे साधारणपणे वर्षापेक्षा जास्त काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद होती. या रस्त्यामुळे नागरिकांना वाहतूकीच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. आता पुन्हा या रस्त्याच्या मधोमध भगदाड पडले आहे. ऊस वाहतूक करण्यार्‍या वाहनांमुळे हे भगदाड वाढू शकते. तसेच रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.  ऐन उसाच्या हंगामात उस वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....

Saturday, November 14, 2020

मंत्री हसन मुश्रीफ यांनी बहिरेवाडी येथे शहीद जवान ऋषिकेश जोंधळेच्या घरी भेटून केले कुटुंबीयांचे सांत्वन

 
        
आजरा (प्रतिनिधी) :

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या हौतात्म्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांना शुक्रवारी रात्री समजताच शनिवारी सकाळी आठ वाजताच बहिरेवाडी (ता. आजरा) या गावात धडकले व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
        
मंत्री मुश्रीफ घरी पोहोचताच ऋषिकेश यांचे वडील रामचंद्र व आई सौ. कविता यांनी 'साहेब, गेला तो परत आलाच नाही. आमचा एकुलता एक वाघ गेला हो.......'  असा आर्त हंबरडा फोडताच मंत्री मुश्रीफ यांचे डोळे पाणावले आणि ते गहिवरले. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या जवान ऋषिकेश यांच्या शहीद होण्याने त्यांच्या कुटुंबासह गाव, जिल्हा, राज्य आणि  देश दुःखाच्या छायेत आहे. बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासीयांना सार्थ अभिमान कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या नररत्नांची खाणच आहे. भारताच्या सरहद्दीत घुसून पाकिस्तान आणि चीनकडून  वारंवार आगळीक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा  काय तो सोक्षमोक्ष लावावाच. संपूर्ण भारत देश त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशा संतप्त भावनाही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, ऊन, वारा, पाऊस या कशाचीही पर्वा न करता सैनिक जीवाची बाजी लावून भारतमातेचे संरक्षण करीत आहेत. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या व विधवा सैनिक पत्नीच्या मालमत्ता कराची माफी ही सैनिकांप्रतीच्या कर्तव्य भावनेतूनच केले, असेही ते म्हणाले.

तीन लाखांचे अर्थसहाय्य.........

मंत्री मुश्रीफ म्हणाले,  दीपावली सणाच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या या आघाताने ऋषिकेश जोंधळे यांच्या एकट्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या परिस्थितीत सर्वांनीच त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे  राहूया. सामाजिक बांधिलकीतून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने त्यांनी या कुटुंबासाठी तीन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य  जाहीर केले.

Friday, November 13, 2020

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीतील जवान शहीद



आजरा (प्रतिनिधी) :

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले आहेत. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

विकास न्यूज तर्फे शहिद जवान ऋषिकेश जोंधळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली....!!

Tuesday, November 10, 2020

आयपीएलवर पाचव्यांदा मुंबई इंडियन्सचा कब्जा


मुंबई (वृत्तसंस्था) :

IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Saturday, November 7, 2020

योग्य खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ काॅन्फरंसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदि उपस्थित होते. जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर्स तयार करण्यात आले होते ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जी मुलं आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शिक्षकांची तपासणी करणार

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आर. टी. पी. सी. आर. चाचणी ही १७ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दि.२३ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.  एका बेंचवर एका बेंचवर बसविण्यात येईल एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाइन वर्गांची सुविधा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा टप्प्या टप्प्यांने सुरू व्हाव्यात

शाळा सुरू करतांना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या तसेच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एस ओ पी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्यांने शाळा सुरू करण्यात येतील असे अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Thursday, November 5, 2020

मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय; सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक




नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने आयपीएल कारकिर्दीत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. इशान किशन (५५*), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला.

नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने चांगली भागीदारी केली. क्विंटन डी कॉक ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर सूर्यकुमार यादव अर्धशतकानंतर लगेचच ५१ धावांवर माघारी परतला. कायरन पोलार्ड (०), कृणाल पांड्या (१३) देखील लवकर बाद झाले. त्यानंतर इशान किशन-हार्दिक पांड्या जोडीने तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. किशनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.

२०१ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच दिल्लीला दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले. दमदार फॉर्मात असलेला शिखर धवनही शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था शून्य धावांवर ३ गडी बाद अशी झाली. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि ऋषभ पंत (३) देखील स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर मार्कस स्टॉयनीस आणि अक्षर पटेल जोडीने काही काळ संघर्ष केला. स्टॉयनीसने लढाऊ वृत्ती दाखवत ४६ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही फलंदाजीत दम दाखवत ४२ धावांची जोरदार खेळी केली. पण अखेर त्यांना ५७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

बातमी व जाहिरात करिता संपर्क 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625

Wednesday, November 4, 2020

दिवाळीच्या तोंडावर कोरोनाची गडद छाया; राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

देशातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत असलं, तरी राजधानी दिल्लीत भीती गडद होताना दिसत आहे. दिल्लीत करोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील करोना परिस्थितीची केजरीवाल यांनी माहिती दिली. दिल्लीत मागील काही दिवसांपासून पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येविषयी केजरीवाल यांनी माहिती दिली. “दिल्लीत करोनाच्या संख्येनं पुन्हा एकदा उसळी घेतल्याचं दिसत आहे. माझ्या मते आपण याला तिसरी लाट म्हणून शकतो. आम्ही सातत्यानं परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आणि घाबरण्याची गरज नाही. आवश्यक ती सर्व पाऊलं आम्ही टाकणार आहोत,” असं केजरीवाल म्हणाले.

“दिल्लीत अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. दिल्लीत मंगळवारी दिवसभरात तब्बल ६ हजार रुग्ण आढळून आले होते. दिल्लीत प्रथमच इतकी मोठी रुग्णसंख्या नोंदवली गेली. मागील पाच दिवसांपासून दिल्लीत ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. “करोना रुग्णांवर उपचारासाठी दिल्लीत पुरेसे बेड आहेत. काही खासगी रुग्णालयात आयसीयू बेडची संख्या कमी आहे, ती एकदोन दिवसात सोडवली जाईल,” असं केजरीवाल म्हणाले.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625

Monday, November 2, 2020

आजर्‍यात भाजपाच्या वतीने वीजबिलाची होळी


आजरा (प्रतिनिधी) :

आजरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणच्या वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ संभाजी चौकात वीजबिलांची होळी करण्यात आली. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारचाही निषेध करण्यात आला. वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन महावितरणचे सहाय्यक अभियंता दयानंद कमतगी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार म्हणाले, कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनमुळे शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक संकटात आहेत. यातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी महावितरणने वाढीव वीजबिले देऊन सार्‍यांचीच चेष्टा चालविली आहे. वाढीव वीजबिलाबाबत सर्वांच्या भावना तीव्र आहेत. याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे. शेजारील राज्यात कोरोना काळातील वीजबिले कपात केलेली असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र वीजबिलाबाबत मुग गिळून गप्प बसले आहे. यातून त्यांचे सर्वसामान्यावरील बेगडी प्रेम दिसून येते. आर्थिक पिळवणूक झालेली असल्यांमुळे वाढीव वीजबिले पूर्णतः माफ करण्यात यावी असेही कुंभार म्हणाले. आंदोलनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, महादेव टोपले, नगरसेवक आनंदा कुंभार, बाळ केसरकर, नाथ देसाई, सचिन इंदूलकर, शैलेश मुळीक, उदयराज चव्हाण, दीपक बल्लाळ, अजित हरेर, राजेंद्र कालेकर, श्रीपती यादव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

(फोटो : आजरा येथे वाढीव वीजबिलांची होळी करताना भाजपचे कार्यकर्ते)

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...