हरणांची शिंगे कोरीवड्याच्या युवकांकडून जप्त; कोगनोळीजवळ बेळगाव वनविभागाची कारवाई
निपाणी (प्रतिनिधी) :
हरणाची शिंगे विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या कोरीवडे (ता. आजरा) येथील दोन युवकांना बेळगाव पोलीस वनविभागाने कोगनोळी (ता. निपाणी) येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हरणाची शिंगे व कवटी जप्त करण्यात आली आहेत. यामाध्यमातून आंतरराज्य रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. तेजस तानाजी पाटील (वय २४) व तुषार तानाजी पाटील (वय २९ दोघेही रा. कोरीवडे ता. आजरा) अशी संशयितांची नावे आहे. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. कोरीवडे येथील दोघांकडे हरणाच्या शिंगाचा साठा तसेच कवटी आहे. त्याची बेकायदेशीरित्या विक्री केली जाणार असल्याची माहीती बेळगाव वनविभागाच्या भरारी पथकाला मिळाली. यानुसार त्यांनी सापळा रचून कारवाई केली.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
No comments:
Post a Comment