आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यातील गडहिंग्लज मार्गापासून हाजगोळी मार्गे पेद्रेवाडी रस्ता काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावरील हाजगोळी बंधार्यानजिकचा रस्ता २०१९ च्या पावसाळ्यात वाहून गेला. त्यातच आता या बंधार्यावरील दुसर्या बाजूला मधोमधच भगडाद पडले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील खर्च केलेला कोट्यावधीचा निधी यामुळे पाण्यात गेला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या स्ट्रक्चर अॉडीटचे मागणी करणार्या लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेल्या रस्ताचा दर्जा सुमार झाल्याने लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावी अशी मागणी होत आहे.
हाजगोळी पेद्रवाडी हा पाच किलोमीटरचा रस्ता साडेतीन कोटी रुपये खर्चून काही महिन्यापूर्वी करण्यात आला. हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आला. हा रस्ता केल्यापासूनच या रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करित होते. त्यातच २०१९ च्या पावसाळ्यात हाजगोळी बंधार्यानजिकचा २०० मीटरचा रस्ता वाहून गेला होता. यामुळे साधारणपणे वर्षापेक्षा जास्त काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद होती. या रस्त्यामुळे नागरिकांना वाहतूकीच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. आता पुन्हा या रस्त्याच्या मधोमध भगदाड पडले आहे. ऊस वाहतूक करण्यार्या वाहनांमुळे हे भगदाड वाढू शकते. तसेच रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन उसाच्या हंगामात उस वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment