गोकूळ शिरगाव (प्रतिनिधी) :
बाल मनाशी समरस होणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील समाजकार्य दिशादर्शक आहे असे मत निदेशक मोहन सातपुते यांनी केले. उचगाव (ता.करवीर) येथील शिंदे कॉलनी मधील अंगणवाडी क्रमांक-८४ येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या वर्धापन दिन व महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. बा. वि. से. योजनेच्या पर्यवेक्षिका सुरेखा कदम होत्या.
येथे महात्मा गांधी जयंती निमित्त बेटी बचाव, बेटी पढाव अभियान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बेटी बचाव, बेटी पढाव अभियान विषयी शपथ ग्रहण करण्यात आले तसेच मल्ल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल अनिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ग्रा.प. सदस्या संगीता दळवी, अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्राचे माजी निदेशक मोहन सातपुते, प्रमोद ढेकळे, पै.जयवंत पाटील, यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. प्रास्ताविक पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल सांगलीकर यांनी केले तर आभार शुभांगी कुंभार यांनी मानले.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
9049969625
No comments:
Post a Comment