Saturday, May 2, 2020

आजरा पोलीसांनी जप्त केलेल्या गाड्या नेणेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे आवाहन


आजरा (प्रतिनिधी ) :

कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर गाडी फिरवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र तरीही विनाकारण फिरणार्‍या गाड्या पोलीसांनी जप्त केल्या होत्या. आजरा पोलीसानी ज्या गाड्या जप्त केल्या होत्या त्या देण्याची प्रक्रिया ४ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले. 

याबाबत दिलेल्या निवेदनात सपोनि बालाजी भांगे यांनी सांगितले की, आजरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की, ज्यांच्या टू व्हीलर व फोर व्हिलर गाड्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत त्या सोडवण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे.
 दि. ४ मे 2020 रोजी फक्त आजरा शहरातील गाड्या सोडण्यात येतील.  दि. ५ मे रोजी ग्रामीण भागातील गाड्या सोडण्यात येतील .

ज्या गाड्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत त्या गाड्या सोडण्यात येणार नाहीत. त्यांनी कोर्टात स्वतंत्र अर्ज करून सदर गाड्याचे ऑर्डर प्राप्त करून घ्यावी. गाड्या सोडण्यासाठी आजरा पोलीस ठाण्याचे पीएसआय जाधव व पोलीस कर्मचारी संग्राम पाटील आणि राजकुमार पाटील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही भेटू नये.

सद्यस्थितीत असणारे लॉकडाऊनची परिस्थिती व  बंद असलेले रोजगार याचा पोलीस दला मार्फत मा. पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहानुभूतीपूर्वक विचार करून कमीत कमी दंड आकारून सदरची गाडी सोडण्यात येणार आहे. जप्त केलेल्या सर्वच गाड्या सोडण्यात येणार असल्यामुळे त्यांच्या गाड्या जप्त आहेत त्यांनी विनाकारण कोणालाही मध्यस्थी साठी घेऊन येऊ नये व पोलीस ठाण्यात गर्दी करू नये. असे आवाहनही सपोनी बालाजी भांगे यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात करिता संपर्क :
विकास डिजिटल मिडीया 
7410168989

1 comment:

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...