गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गडहिंग्लज येथील डॉक्टर कॉलनीमधील रहिवाशी आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे किणे (ता. आजरा) शाखेचे शाखाधिकारी रणजित लक्ष्मण कांबळे (रा. सुळे ता. आजरा) यांचे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अपघाती निधन झाले.
रणजित कांबळे हे आपल्या दुचाकीवरून गडहिंग्लज येथून किणे शाखेकडे चालले होते. महागावनजिकच्या लाकुडवाडी घाटात लाकुडवाडी गावच्या थांब्यापासून काही अंतरावर गाडीचा ताबा सुटल्याने रणजीत कांबळे रस्त्याच्या बाजूच्या झाडाला जोरदार धडकल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, पण त्यापूर्वीच ते मयत झाल्याचे आढळून आले. रणजित कांबळे सुळेचे दोन वर्षे सरपंच होते तर महात्मा फुले सेवा संस्थेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त कळताच गडहिंग्लज आणि सुळे येथे हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्यांसाठी संपर्क :
7410168989
No comments:
Post a Comment