आजरा (प्रतिनिधी) :
तसं पहायला गेलं तर क्रिकेट व खाद्यसंस्कृती यांचा दुरान्वयेही संबध नाही. मात्र क्रिकेट स्पर्धेत खवय्यांसाठी पर्वणी ठरणारी बक्षीसे असतील तर..... आतापर्यंत आपण स्पर्धांसाठी रोख रक्कमेची किंवा शिल्ड, मेडलची बक्षीसे असल्याचे ऐकले असेल. पण साळगाव (ता. आजरा) येथील क्रिकेटप्रेमी युवकांनी अनोख्या बक्षीसांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या विजयी संघाला चक्क बोकड बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला आठ गावठी कोंबडे तर तिसर्या क्रमांकाच्या संघाला सहा गावठी कोंबडे बक्षीस मिळणार आहे. याबरोबरच आकर्षक वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. या क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघांची थर्टीफस्ट संस्मरणीय होणार आहे. ही स्पर्धा पेरणोली रोडवरील क्रीडांगणावर सोमवार (दि. २८) पासून रंगणार आहे. भव्य ओपन हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडू एकाच गावातील आवश्यक आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निलेश पाटील (मो.९४०४९९०४२१), ओंकार माडभगत (९४२१७१२०७४), विनायक लोहार (९४२२११७३७३) व रोहन पारके (८६००२२२१२५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब......