Friday, December 18, 2020

प्राप्तिकर विभागाचा निरिक्षक दहा लाखाची लाच घेताना ताब्यात; कोल्हापूरातील प्रकार


कोल्हापूर (प्रतिनिधी) :  

एका डॉक्टर कडून छापा न टाकण्यासाठी तब्बल दहा लाखाची लाच घेताना प्राप्तिकर विभागाचा निरीक्षक आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. प्रताप महादेव चव्हाण (वय ३४ रा. राजारामपुरी कोल्हापूर) असे या निरीक्षकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन फुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना पकडले.

कोल्हापूर शहरातील डॉक्टर विरोधात अज्ञात व्यक्तीने प्राप्तिकर विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या अनुषंगाने प्राप्तीकर विभागाकडून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकण्याचा इशारा निरीक्षक चव्हाण यांनी दिला होता. हा छापा टाकू नये यासाठी डॉक्टरने चव्हाण यांना विनंती केल्यानंतर यासाठी सुरुवातीला चव्हाण यांनी 25 लाख रुपयाची लाच मागणी केली. शेवटी हा व्यवहार 14 लाख रुपये असा ठरला. ठरलेल्या रकमेपैकी दहा लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले होते. ही रक्कम घेताना चव्हाण याला लातूर विभागाने अटक केली. 

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...