गारगोटी (प्रतिनिधी) :
गारगोटी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व युवक नेते राहूलदादा देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आबालवृध्दांनी देसाई यांच्या संपर्क कार्यालयात मध्ये गर्दी केली. यावेळी राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यानी देसाई यांचा सत्कार केला.
राहूल देसाई यांना महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार पी. एन .पाटील, माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, गोकुळचे संचालक अंबरिशसिंह घाटगे, आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी, दूध साखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, राजेंद्र मुकदम, सरदार मिसाळ, विजय भोजे यांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या.
गोकुळ संचालक धैर्यशील देसाई, बिद्री साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुनीलराव सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, मनोज फराकटे, माजी उपसभापती सत्यजित जाधव, बिद्रीचे संचालक धोंडीराम दादा मगदूम, प्रदीप पाटील, मधुकराव भोई, शिक्षक नेते दादा लाड, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, वसंतराव प्रभावळे, भाजपाचे सरचिटणीस प्रवीण सावंत, उपाध्यक्ष नाथाजी पाटील, अध्यक्ष डॉ. विनायक परूळेकर, तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. स्वागत अनिल तळकर यांनी केले. प्रास्ताविक बजरंग कुरळे यांनी तर आभार प्रकाश वास्कर यांनी मानले.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
No comments:
Post a Comment