पुणे (प्रतिनिधी) :
भाजपाचा बालेकिल्ला असणार्या पुणे पदवीवर मतदार संघावर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादीचे उमेदवार) अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यावर ४८,८२४ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला.
पुणे पदवीधरच्या इतिहासात यावेळी प्रथमच मोठ्या संख्येने मतदान झाले. २,४७,६८७ इतके मतदान झाले. त्यापैकी १९,४२८ मते अवैध ठरली. २,२८,२५९ वैध मते होती. त्यामुळे १,१४,१३० मतांचा कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी पहिल्या पसंतीची १,२२,१४५ मते मिळवत विजय प्राप्त केला. भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३,३२१ मते मिळाली. मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांना ६७१३, आपच्या डॉ. अमोल पवार यांना ११२१, जनता दलाच्या प्रा. शरद पाटील यांना ४२५९, सोमनाथ साळुंखे यांना ३१३९, धनजंय गोंदकर यांना ९८९, निता ढमाले यांना ५३२, श्रीमंत कोकाटे यांना ६५७२, युवराज पवार यांना ५२० मते मिळाली. महाविकास आघाडिच्या उमेदवाराच्या नावाचा उमेदवार असलेल्या अपक्ष अरुण लाड यांना २५५४ मते मिळाली.
बातमीकरिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
No comments:
Post a Comment