कोल्हापूर (प्रतिनिधी) :
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी करत चंद्रकांतदादांना घरचा आहेर दिला आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून दोघांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये उभी फूट पडली आहे.
सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षात फोडाफोडी करून अनेकांना भाजपमध्ये घेतले. पण जुन्या जाणत्यांना डावलून नव्यांना व इतर पक्षातून आलेल्यांनाच पदे दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. त्यातच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक गांर्भियाने घेतली नसल्याने भाजपचा पराभव झाला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा, असा घरचा आहेर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. भाजपाचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांतदादा पाटील व समरजित घाटगे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील हे राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना नेहमीच आव्हान देत असतात. मात्र होमगाऊंडवरील भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या नेतृत्त्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना अंगावर घेणारे चंद्रकांत पाटील घरातील हे आव्हान कसे थोपवणार, याची चर्चा सुरू झााली आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....
No comments:
Post a Comment