Tuesday, November 25, 2025

सर्वसामान्य जनताच माझ्यासाठी पक्ष : आजरा नगरपंचायत निवडणूक येथील अपक्ष उमेदवार मंजूर मुजावर यांची रोखठोक भूमिका

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आत्तापर्यंत आजरा शहरावर प्रस्थापित मंडळींनीच राज्य केले आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे. आजरा शहरातील ही सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनताच माझ्यासाठी पक्ष आहे. त्यांच्या विश्वासावरच मी आजरा नगरपंचायतीची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याची भूमिका मंजूर मुजावर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

मंजूर मुजावर पुढे म्हणाले, मी स्वतः उच्चशिक्षित असून विज्ञान विभागातून पदवीधर आहे. काही काळ मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी देखील केली आहे. मात्र घरगुती अडचणीमुळे मी गावी परतलो आणि समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले आहे. नगरपंचायतीच्या गतसभागृहात माझी पत्नी यासीराबी यांनी नगरसेविका म्हणून काम केले आहे. त्या काळात प्रभागाबरोबर शहराच्या विकास कामात माझा हातभार लागला आहे. त्या जोरावरच मी आत्ता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहे. आत्तापर्यंतच्या निवडणुकीत पारंपारिक जुने चेहरे सातत्याने समोर येतात. याला छेद देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. माझ्या कार्याची माहिती आजरा शहरातील सर्व नागरिकांना आहे. कोरोना काळात ही मी सर्वांना मदत केली आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मला मिळत आहे. स्वच्छ साजरा सुंदर आजरा बनवण्याचा माझा ध्यास आहे. शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीचा, महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच स्वच्छता अशा विविध क्षेत्रात मला काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य जनताच मला बळ देऊन इतिहास घडविल आणि नगराध्यक्षपदी विराजमान करीन असा विश्वास आहे. यावेळी सादिक नेसरीकर, करीम कांडगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच नगराध्यक्ष पदासाठी अर्ज राहिलेले नियामत मुजावर यांनी मंजूर मुजावर यांची विकास कामासाठीची धडपड बघून त्यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी अंजुर मुजावर, शपाक हेरेकर, नजीर मुजावर, युनूस मुल्ला, शौकत लमतुरे, हजरतअली मुल्ला, शमशुद्दीन हेरेकर, आयुब माणगावकर, सलीम मुल्ला, अब्दुल रजाक माणगावकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
===========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...