Friday, December 19, 2025

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APKs), तसेच मोबाईल SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंक मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवत आहेत. यामुळे सर्व वाहन चालक, मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. सर्व वाहन चालक, मालक यांनी परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

अधिकृत शासकीय संकेतस्थळ पुढीलप्रमाणे-
वाहन नोंदणी सेवा (VAHAN) - https://vahan parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) - https://sarathi.panvahan.gov.in, परिवहन सेवा - https://www.parivahan.gov.in, ई-चलन पोर्टल - https://echallan parivahan.gov.in
वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे ".gov.in" ने समाप्त होतात. ".com", "online", "site", "in" अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाइट नागरिकांनी उघडू नयेत. आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी देण्यात येते व अनधिकृत लिंक पाठविण्यात येऊन त्वरित दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात. "DL (वाहन चालविण्याचा परवाना) सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा." RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी, असे संदेश फसवणूक करणाऱ्यांकडून पाठविले जातात.
RTO Services.apk", "mParivahan Update.apk", "eChallan Pay.apk" अशा अनधिकृत APK ॲप्स चोरीला जाण्याची शक्यता असते. नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश/लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ National Cyber Crime Portal-https://www.cybercrime.gov.in तसेच सायबर फसवणूक हेल्पलाइन - १९३०  किंवा जवळचे जिल्हा सायबरर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
======================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...