Monday, November 24, 2025

मलिग्रे येथे रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न, दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मलिग्रे (ता. आजरा) येथील सन 2008-09 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी पंचक्रोशीतील रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन सामाजिक जाणिव प्रगल्भ करीत, एकत्र येऊन वर्गणीच्या फंडातून, चक्क रूग्णवाहीका खरेदी करून, भावेश्वरी रूग्णवाहीकेचे लोकार्पण सोहळा संपन्न केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या. प्रमुख पाहूणे केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे सचिव अनिरुध्द रेडेकर  व आजरा कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई याच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.

सुत्रसंचालन व प्रास्ताविक संजय घाटगे यानी केले. यावेळी रेडेकर यांनी बोलताना दहावीच्या बॅचच्या वतीने जनतेची सेवा करण्यासाठी घेतलेल्या निर्णायाचे अभिनंदन करून शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आजरी पडली तर एक-एक वर्षाचे उत्पन्न संपते. तर रूग्णवाहीकेसाठी आँक्सिजन सिलेण्डर अत्यावश्यक असून, तो आपल्या हाँस्पीटल मार्फत देण्याचे तसेच रुग्ण कै. केदारी रेडेकर हाँस्पीटला आणल्यास शासकीय योजनेतून मोफत सेवा व रूग्णवाहीकेसाठी डिझेल देण्याचे आश्वासन दिले. आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी युवा नेतृत्व किशोर जाधव याच्या कार्याचा गौरव करत त्याच्या बँचच्या विध्यार्थ्यांनी रूग्णसेवेचा वसा मानवतेला जोडणारा असलेचे सांगितलं. तर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यानी रूग्णाची सेवाही भगवंताची सेवा असून, अध्यात्मिक समाधानासाठी मंदीराची तर गुणवत्तापुर्ण प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे. यासाठी आदर्श शाळा व आरोग्य सेवा ह्या समाज उपयोगी असल्याचे या विध्यार्थ्यांनी कृतीतून दाखवल्याचे सांगितलं.

सरपंच शारदा गुरव यांनी रूग्णवाहीका ही मलिग्रे गावच्या अभिमानाची गोष्ट असून, रुग्णवाहिका नियमित रहाणेसाठी दुरुस्ती, डिझेल व ड्रायवर पगार यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे सांगितले. यानंतर आरोग्य सहाय्यक जे. एम. बोकडे, धीरज देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँ. संगिता परमार, डाँ. संध्या राऊत, उपसरपंच चाळू केंगारे, पोलीस पाटील मोहन सावंत, माज़ी सरपंच अशोक शिंदे, गजानन देशपांडे, युवा नेते किशोर जाधव, महेश तर्डेकर, संदीप केंगारे, संतोष मराठे, मंगल पारदे, तालुका संघाचे संचालक भाऊ किल्लेदार, डांँ. सुदाम हरेर, डाँ. एम आर खवरे, सुभाष चौगले, जगन्नाथ बुगडे, सुनंदा बुगडे, बिपीन जाधव याच्यासह अंगणवाडी सेविका, मराठी शाळा शिक्षिका, विध्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार विश्वास बुगडे यांनी मानले.
=========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...