Tuesday, November 25, 2025

ताराराणी आघाडीचा प्रभाग 10 मध्ये प्रचार दौरा; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत निवडणुकीला आता चांगलाच रंग भरला आहे. प्रत्येक आघाड्या आपापल्या परीने प्रचाराचा जोर लावताना दिसत आहेत. ताराराणी आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मंगळवारी सकाळी प्रभाग क्रमांक दहा मध्ये ताराराणी आघाडीच्या वतीने प्रचार दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार अशोक काशिनाथ चराटी व प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार सिकंदर इस्माईल दरवाजकर यांच्या समर्थनार्थ प्रभाग क्रमांक दहा मधील कुंभार गल्ली व परिसरामध्ये  रॅलीचे आयोजन व घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. या प्रभागामध्ये उमेदवारांच्याकडून घर टू घर प्रचार व वैयक्तिक प्रचारावर भर देण्यात आला. या प्रचार रॅलीमध्ये बहुसंख्य कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते. सरपंच संघटनेचे अध्यक्ष जी. एम. पाटील, विलासराव नाईक, विजयकुमार पाटील, जितेंद्र टोपले, डॉ. दीपक सातोसकर, वसीम दरवाजकर, शोएब दरवाजकर, वासू केसरकर, बापू पारपोलकर, मोहम्मद दरवाजकर, भरत कांबळे, प्रशांत कुंभार, बाळू कुंभार, प्रशांत कुंभार, जोतिबा कुंभार, अमोल कुंभार, प्रकाश कांबळे, संतोष कुंभार, संजय जांभळे, राजेंद्र कुंभार, सुधीर वढवलेकर, अमर कुंभार यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
===========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...