Friday, October 10, 2025

आजरा महाविद्यालयाचे प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांची राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटक संच विकसन कार्यशाळेकरिता राज्यस्तरीय विशेष तज्ञ म्हणून निवड

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आदेश जा.क्र./राशैसंप्रपम/सा.शा.वि/व्य.मु./२०२५/नुसार, दि. - २०/०९/२०२५च्या आदेशान्वये
तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डायट) कोल्हापूर यांचे आदेश जा.क्र./जिशिप्रसको/सा.शा.वि./ व्य.मु. /2025 / 1147 / दिनांक 23/ 09 / 2025 राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन कार्यशाळेसाठी  राज्यस्तरीय विशेष तज्ज्ञ समिती सदस्य म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून आजरा महाविद्यालय आजरा येथील प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे  यांची निवड करण्यात आली असून ते आपल्या या क्षेत्रातील अनुभव याकामी देणार आहेत.
   
सध्याच्या काळात व्यसन हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विदयार्थी आणि युवकांतील या वाढत्या व्यसनाच्या सवयीमुळे आरोग्य, कुटुंब, समाज पर्यायाने राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. शाळा, महावि‌द्यालयीन अभ्यासक्रमात व्यसन आणि व्यसनांचे दुष्परिणाम यांचा समावेश करण्याबाबत सूचित केलेले आहे. तद्नुषंगाने  विदयार्थी आणि युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्ती या विषयाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधनात प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन निर्मिती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटक संच विकसन निर्मितीसाठी  पहिली कार्यशाळा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती. या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेचे संचालक राहुल रेखावार (भाप्रसे) व उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक अरुण जाधव, सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग, तसेच अधिव्याख्याता श्रीमती. शितल शिंदे, बाळासाहेब गायकवाड यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले.
=====================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...