Saturday, October 11, 2025

व्यंकटराव शिक्षण संकुलात "ग्रीन डे" व "अर्थ मिनिट" निमित्त प्रतिज्ञा व प्रभात फेरी संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
ग्रीन डे व अर्थ मिनिटनिमित्त शासनाच्या आदेशानुसार  व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे या संदर्भात माहिती एस. वाय. भोये यांनी दिली. तसेच प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर यांनी पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी आपण व आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. जवळच्या अंतरापर्यंत शक्यतो चालत जाणे, दूरच्या पल्यासाठी शक्य तितक्या वेळेला एसटी बस अशा मोठ्या वाहनांचा प्रवासासाठी वापर केले पाहिजे. सायकलचा वापर करणे अंगीकृत केले पाहिजे त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. व शक्य तितक्या प्रमाणात विजेचा काटकसरीने वापर केला पाहिजे. याबाबत माहिती सांगितली. एनसीसी ऑफिसर एम. एस. पाटील यांनी पर्यावरण पूरक ग्रीन डे  प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणवूनन घेतली.

यानंतर विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण पूरक फलक घेऊन आजरा शहरांमध्ये प्रभात फेरी काढून घोषणा देत जनजागृती केली. या प्रभात फेरीला आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुभाष सावंत आणि त्यांची संपूर्ण शासकीय अधिकारी टीम यांनी भेट दिली. आजरा पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी प्रभात फेरी मधील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना रात्री आठ वाजता "अर्थ मिनिट अंतर्गत" किमान दहा मिनिट आपल्या घरातील सर्व विजेची उपकरण बंद करून वीज बचतीचा आणि काटकसरीचा नवा अध्याय आपणापासूनच सुरू करावा असे  सांगितले. त्याचप्रमाणे सायकलचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वही सांगितलं त्याचप्रमाणे पायी चालण्यानेही आपला शारीरिक व्यायाम होऊन अनावश्यक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनाचा वापर कमी होतो. पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते. तसेच विद्यार्थी जीवनामध्ये कागदाचाही वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे ते सांगून कागद निर्मितीसाठीचे वृक्ष तोड, वीज वापर, पाण्याचा अपव्यय कमी करता येतो. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, सौ. व्ही. ए. वडवळेकर, सौ. ए. एस. गुरव, कृष्णा दावणे, सौ. एस. डी. इलगे, श्रीम. एन. ए. मोरे, व्ही. एस. गवारी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
=================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...