कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार कोल्हापूर जिल्हा परिषद व कोल्हापूर जिल्ह्यातील खाली नमूद केलेल्या 12 पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे विशेष सभा आयोजित केल्या आहेत.
जिल्हा परिषद कोल्हापूर (जि.प. निवडणूक विभाग)- ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती निर्णायक गणासाठी पंचायत समिती सभागृह शाहुवाडी, नगरपालिका मयुरबाग हॉल पन्हाळा, तहसिल कार्यालय हातकणंगले पहिला मजला मिटींग हॉल ता. हातकणंगले, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह पहिला मजला तहसिल कार्यालय शिरोळ, बहुउद्देशीय सभागृह कागल, शासकीय बहुउद्देशीय हॉल रमणमळा कसबा बावडा करवीर, तहसिलदार यांचे दालन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, गगनबावडा, राजर्षी शाहू सभागृह पंचायत समिती राधानगरी, आम. दिनकरराव जाधव सभागृह पंचायत समिती भुदरगड, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह आजरा, महसूल भवन गडहिंग्लज, ऑडीटोरियम हॉल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चंदगड या सर्व ठिकाणी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सभा होणार असून जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी नमुद केलेल्या ठिकाणी व वेळेत हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment