Thursday, October 2, 2025

वाटंगी येथे 'स्वस्थ नारी–सशक्त परिवार' आरोग्य शिबिर यशस्वी; २८७ महिलांची तपासणी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), वाटंगी (ता. आजरा) येथे "स्वस्थ नारी–सशक्त परिवार" अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर अत्यंत यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात एकूण २८७ महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात २६६ महिलांची जनरल तपासणी झाली. यामध्ये १०९ महिलांची हिमोग्लोबिन (HB) आणि ६८ महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली. कॅन्सर स्क्रीनिंगसाठी १४ महिलांची VIA Test करण्यात आली. डॉ. शेख मॅडम, डॉ. गॉडद मॅडम (माहेर हॉस्पिटल), संत गजानन हॉस्पिटलची टीम आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. शिबिरात रक्त तपासण्या, दंत तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, पोषण मार्गदर्शन आणि कर्करोग तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या सेवा पुरवण्यात आल्या. सरपंच सौ. इंदू कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. माजी सभापती मा. अल्बर्ट डिसोजा यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, "सशक्त महिला–सशक्त समाज" हा संदेश प्रत्यक्षात उतरला.
===================

No comments:

Post a Comment

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्य...