Thursday, October 2, 2025

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३६ वी वार्षिक सभा संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३६ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली. वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत यांनी स्वागत करून वर्ष भरात संस्थेने केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तसेच जिल्हयाचे पालकमंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांच्या विशेष प्रयलातून मंजूर झालेल्या ४.५० कोटी इतक्या भरीव निधीतून ग्रंथालयाची चार मजली भव्य वास्तू शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारत आहे. सुसज्ज अभ्यासिकेसह ग्रंथालय स्वतःच्या इमारतीत लवकर सुस्थापीत करण्यासाठी कार्यकारी मंडळ प्रयलशिल असल्याचे त्यांनी सांगीतले. अहवाल सालात वाचनालयाच्या स्पर्धापरीक्षा विभागातील तब्बल १४ विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेव्दारे शासकिय सेवेत नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगीतले ग्रंथालयाने वय वर्षे १६ पर्यतच्या विद्यार्थ्यांना बालविभागाचे मोफत सभासदत्व देण्याची अभिनव योजना सुरू केली आहे, याचा लाभ बालकुमार गटातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी स्पर्धापरीक्षा विभागातील यशस्वी अभ्यासक सिध्दी अनिल देसाई (सुलगाव), कार्तिक वसंत गुरव (परणोली), सुनिल शंकर गिलबिले (वाटंगी), नम्रता सुनिल गिलबिले (वाटंगी), बाळासाहेब जोतिबा कांबळे (बोलकेवाडी), अलका बाबूराव मुगुर्डेकर (कासार कांडगाव) तसेच ग्रंथालयाच्या मोफत बालवाचक सभासद नोंदणी अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन वाचन चळवळीला बळ दिल्याबद्दल 'जिल्हा परीषद आदर्श शिक्षक पुरस्कार' प्राप्त ग्रंथालयाच्या सभासद अर्चना सुनिल पाटील व ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा विद्या हरेर यांचा शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. ग्रंथालयाचे संचालक सुभाष विभुते यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती झालेबद्दल, डॉ. अशोक बाचुळकर यांना हिंदुस्थानी प्रचार सभेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल, विनायक आमणगी यांचा सेवानिवृत्तीबद्दल व अंतर्गत लेखापरीक्षक प्रकाश देसाई यांचाही यावेळी सत्कार करणेत आला.

सूरवातीला अहवाल सालात निधन पावलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यकारीणी सदस्या डॉ. अंजनी देशपांडे यांनी श्रध्दांजली ठराव मांडला. सभेची विषयपत्रिका, मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक पत्रकांचे वाचन कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी केले त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. सभेला डॉ अनिल देशपांडे, मारूतीराव मोरे, आप्पासो पावले, अनंत आजरेकर शिवाजीराव पाटील, शिवाजीराव इंजल, आप्पा पावले, अनिल देसाई, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संभाजी इंजल, सदाशिव मोरे, बंडोपंत चव्हाण, गिता पोतदार, सुचेता गडडी, वर्षाताई कांबळे, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखील कळेकर, महादेव पाटील यासह सभासद उपस्थीत होते. संचालक विजय राजोपाध्ये यांनी सुत्रसंचालन केले. तर महंमदअली मुजावर यांनी आभार मानले.
==================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...