Wednesday, December 17, 2025

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्याचे नेते अशोक अण्णा चराटी यांच्या हस्ते करणेत आला. या कामासाठी जयवंत मसणू सुतार यांचे विशेष प्रयत्न आणी लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांचे सहकार्य लाभले तसेच सहपालक मंत्री ना. माधुरीताई मिसाळ यांचेकडून निधी प्राप्त झाला.

याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, सरपंच प्रियांका आजगेकर, उपसरपंच संगीता सुतार, सदस्या रेशमा पाटील, सदस्य तातूअण्णा बटकडली, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, माजी पोलीस उपनिरीक्षक बचाराम चव्हाण, किणे माजी सरपंच सुरेश गिलबिले, तुकाराम बामणे, अशोक आजगेकर, कृष्णा पाटील, तानाजी पाटील, गणपती जाधव, जीवन आजगेकर, अरुण पाटील, अमर पाटील, अजित हरेर, ग्रामसेवक अजित देसाई, गणपती पाटील उपस्थित होते.
====================

No comments:

Post a Comment

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्य...