कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी - नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात जाहीर झालेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक शक्ति कदम, तहसीलदार निवडणूक सुनील शेरखाने यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, २०२० मधील मतदार नाव नोंदणी असली तरी पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ व शिक्षक नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरुन देणे आवश्यक आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारे पदवीधर पात्र राहतील. सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील पदवीधर कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील पदवीधर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी.
शिक्षक मतदार नोंदणीसाठी २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक व त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहील. शैक्षणिक संस्थांचे प्रमुख (मुख्याध्यापक/प्राचार्य) एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करू शकतात. शैक्षणिक संस्थांनी नमुना क्रमांक २ मधील शिफारशीसह अर्ज सादर करावेत असेही ते म्हणाले.
कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरीक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तथापि, एकाच कुटुंबातील एकत्र राहणाऱ्या कुटुबियांचे अर्ज कुटुंबातील कोणतीही व्यक्ती एकत्रित सादर करू शकते, असेही त्यांनी सांगितले. मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रणाली सुरू झाल्यानंतर त्याची माहिती प्रसिद्धीमाध्यमातून जाहीर करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी अशी पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा पाच जिल्ह्यात मिळून ६३ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्याशिवाय ५८४ (कोल्हापूर १७४ ) पद निर्देशित अधिकारी आणि १२२ अतिरिक्त पद निर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मतदार नोंदणीचा कार्यक्रम
जाहीर सूचना ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून त्यानुसार मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार १५ ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार २५ ऑक्टोबर, नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक-गुरूवार ६ नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार २० नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार २५ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार २५ डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार ३० डिसेंबर २०२५.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला
मुंबई, न्यूज नेटवर्क : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 101 व्या वर्षी त्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment