आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मराठवाडा-विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवित व वित्त हानी अपरिमित झाली आहे. लोकांचे संसार उद्धव झालेत. अन्न धान्याची, चा-याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा वेळी आपल्या बांधवाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे परम कर्तव्य आहे. याच उदात्त भावनेतून पूरग्रस्तांना आजरा येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखाचा धनादेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी हा धनादेश दिला.
यावेळी बोलतांना ना. प्रकाश आबिटकर म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती, संस्था संघटनानी उभे राहण्याची गरज आहे, हे ओळखून आपल्या आजरा येथील जनता गृहतारण संस्थेने मदतीचा हात पुढे केला, अनेक सहकारी व सामाजिक संस्थासाठी हा आदर्श आहे. संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर, संस्थेचे संचालक व गारगोटी शाखेचे चेअरमन आनंद चव्हाण, व्हाईस चेअरमन डॉ. संजय देसाई, संचालक महादेव मोरुस्कर, सत्यजित चोरगे, रणजित पाटील, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment