Thursday, August 14, 2025

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

मुंबई, न्यूज नेटवर्क : 
महाराष्ट्र राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केले आहे. यासाठी पहिली मुदतवाढ देऊन अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत होती मात्र त्याला 15 ऑगस्ट ची पहिली तर 30 नोव्हेंबर ही दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2025 नंतर HSRP नसलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
============

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...