Thursday, August 14, 2025

आजऱ्यात भाजपच्या वतीने तिरंगा यात्रा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आजरा तालुका यांच्यावतीने आजरा शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेला आजरा तहसीलदार कार्यालयापासून सुरुवात झाली, या यात्रेचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये हर घर तिरंगा यासह विविध उपक्रम राबवले जात आहेत. आजरा शहरात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, तिरंगा यात्रेचे संयोजक जयवंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शालेय विद्यार्थी, युवक, महिला, माजी सैनिक, एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या यात्रेदरम्यान "भारत माता की जय", "वंदे मातरम","जय जवान जय किसान", "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणांनी आजरा शहर दणाणून गेले. यावेळी माजी सैनिक दत्तात्रय मोहिते, संभाजी सरदेसाई, सुधीर कुंभार, नाथ देसाई, समीर चांद, अनिकेत चराटी, जयवंत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, दशरथ अमृते, ज्योस्ना चराटी, संयोगिता बापट, विकास बागडी, शैलेश मुळीक, संदीप गुरव, आनंदराव कातकर, राजू दिक्षित, विजय आमृसकर, तुकाराम बामणे, विष्णू गुडूळकर, संतोष चौगुले, आनंदा कांबळे, दयानंद चव्हाण, पंकज वासकर, रामजी पाटील, मनीष टोपले, अमोल पाटील, अमोल सुतार, गणपती पाटील, सचिन सटाले, गिरीश मावनूर, नदीम मुल्ला, अभिजित रांगणेकर, उमेश पारपोलकर, मंगेश तेउरवाडकर, अनिकेत देऊसकर, निखिल होडगे, शामली वाघ, माधुरी पाचवडेकर, अनिल पाटील, महेश कुरुणकर, आनंदा मोहिते, संदीप वाटवे, दीपक बल्लाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आजरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंचायत समिती आजाराच्या परिसरातील स्वातंत्र्यवीर स्तंभाच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
====================

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...