Friday, August 1, 2025

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ, नोटिफिकेशन जारी

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : 
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे.

कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी होती. कोल्हापूर,  सांगली,  सातारा,  सोलापूर,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली. आता या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

=================

No comments:

Post a Comment

होनेवाडीत रस्ते कामाचा शुभारंभ; अशोकअण्णा चराटी, जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : होनेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजरा तालुक्य...