Wednesday, August 6, 2025

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू परीट, शहराध्यक्षपदी अभिषेक रोडगी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू मारुती परीट (एरंडोल) यांची तर आजरा शहराध्यक्षपदी अभिषेक सदानंद रोडगी यांची निवड करण्यात आली. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा येथे झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र मध्य प्रांत सदस्य ऍड. सुप्रियाताई दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक नाथ देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य रामदास चव्हाण उपस्थित होते.

आजरा तालुक्याची नूतन कार्यकारणी : गुंडू मारुती परीट (तालुकाध्यक्ष), देविदास कृष्णा सूर्यवंशी (तालुका उपाध्यक्ष), किरण केसरकर (तालुका उपाध्यक्ष), मंगेश परशराम पोतनीस (तालुका सचिव), विकास सुतार (तालुका सहसचिव), सचिन इंदुलकर (तालुका कोषाध्यक्ष), नाथ देसाई (तालुका निमंत्रित मार्गदर्शक), अभिषेक सदानंद रोडगी (आजरा शहराध्यक्ष), दीपक बल्लाळ (आजरा शहर उपाध्यक्ष), राजश्री सावंत (तालुका महिला अध्यक्षा), गीता पोतदार (तालुका महिला उपाध्यक्ष), दिपाली सुतार (तालुका महिला उपाध्यक्ष), ज्योती पांडव (तालुका महिला सचिव).

================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...