आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा मार्फत सायन्स ॲकॅडमी वर्गाचा शुभारंभ कार्यक्रम संस्था अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते, इतिहास अभ्यासक, लेखक व कवी प्रा. मधुकर पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
उद्याच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी शिक्षक व पालक यांची भूमिका या विषयावर बोलताना प्रा मधुकर पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने लहानपणापासून आपले ध्येय निश्चित करावे ते करत असताना प्रथम आपल्या परिस्थिती आणि डोळ्यासमोर आई-वडिलांचे काबाड कष्ट यांचा विचार केला पाहिजे. म्हणजे आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि इतर अवांतर गोष्टीकडे त्याचे मन वळणार नाही. असे सांगत कष्ट करण्याची तयारी आणि वेळेचे नियोजन तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून गरीब परिस्थितीतही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अनेक ध्येयवादी विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थी पालक यांच्यामध्ये नव चेतना निर्माण करण्याचे काम या व्याख्यानातून झाल्याचे दिसते.
संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, आजरा शहरात प्रथमच व्यंकटराव संकुलामार्फत सुरू होणाऱ्या सायन्स अकॅडमी या वर्गाचा उद्देश म्हणजे तालुक्यातील गाव व खेडोपाड्यातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना जेईई, नीट, परीक्षेची तयारी करता यावी आणि पुढे आपल्या अकॅडमी मधून आयआयटीमध्ये प्रवेश, शास्त्रज्ञ, उत्कृष्ट इंजिनियर, डॉक्टर, तसेच अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी ही या वर्गातून करून घेतली जाणार आहे. यासाठी इयत्ता आठवी, नववी, दहावी साठी फाउंडेशन कोर्स व अकरावी, बारावी ॲकॅडमीचा कोर्स सुरू करत आहोत यामध्ये दिल्ली येथील नामांकित कॉलेजमधील अकॅडमी वर्गातील अध्यापनाचा अनुभव असणारे चार प्राध्यापक ज्ञानदान करणार आहेत.
अध्यक्षीय मनोगतामध्ये जयवंतराव शिंपी यांनी प्रशालेच्या या यशस्वी वाटचालीमधील अकॅडमी वर्गाचा शुभारंभ म्हणजे आपल्या व्यंकटराव प्रशालेतून अनेक विद्यार्थी प्रतिवर्षी पालक, शिक्षक यांच्या संस्कार आणि ज्ञानाच्या जोरावर देशातील विविध क्षेत्रात आजऱ्याच्या मातीचा सुगंध दरवळत ठेवणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, खजिनदार सुनील पाटील, संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विक्रांत पटेकर, अशोक पोवार, प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य पन्हाळकर, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी चव्हाण, भादवण हायस्कूल मुख्याध्यापक एस. एन. पाटील, सिरसंगी हायस्कूल मुख्याध्यापक महादेव नागुर्डेकर, देवर्डे हायस्कूल मुख्याध्यापक सुभाष सावंत, पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पारळे यांनी केले. प्रमुख वक्त्याचा परिचय व्ही. टी. कांबळे यांनी केले. आभार व्ही. ए. वडवळेकर यांनी माणले.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment