आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
तमाम आजरावासीयांना प्रतीक्षा असणाऱ्या शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सोमवार (दि. 28 एप्रिल) व मंगळवार (दि. 29एप्रिल) रोजी लोकार्पण होणार आहे. यानिमित्त दोन दिवस आजरा शहरात भव्य दिव्य कार्यक्रमांची मांदियाळी असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण समितीने पत्रकार परिषदेत दिली.
स्वागत संभाजी इंजल यांनी केले. दोन दिवसीय कार्यक्रमांची माहिती देताना विजयकुमार पाटील म्हणाले, आजरा येथील शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाची तमाम आजरा तालुकावाशीयांना गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता पूर्ण होत आहे. यानिमित्ताने सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांच्या सहभागातून लोकार्पण सोहळा होणार आहे. चांगला व भव्य-दिव्य असा ऐतिहासिक संयुक्तिक कार्यक्रम होणार आहे. सोमवार (दि 28) रोजी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत शिवतीर्थावर होम हवन, अभिषेक, धार्मिक विधी होणार आहेत. अभिषेकासाठी आजरा तालुक्यातील प्रत्येक गावातून तसेच आजरा शहरातील प्रत्येक गल्लीतून जल कलश येणार आहे. या कलशांची लिंगायत मठ ते शिवतीर्थ अशी मिरवणूक काढून त्यानंतर जलाभिषेक होणार आहे. दुपारी तीन वाजता शिवतीर्थावर ढोल ताशा पथक यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शिवशाहीर पोवाडाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी आतषबाजी देखील करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजी पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे व राजर्षी शाहू महाराज वंशज खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीसाठी समिती प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीसाठी मदत केलेल्या जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींनाही या निमित्ताने आमंत्रित करण्यात येणार आहे.
मंगळवार (दि. 29) रोजी छत्रपती शिवजयंती उत्सव होणार आहे. सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान अकरा नद्यांच्या पाण्याचा जलाभिषेक शिवतीर्थवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला करण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान महिलांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा आजरा शहरातील पंचायत समिती ते शिवतीर्थ अशी निघणार आहे. सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवजयंती निमित्त आजरा शहरातून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे. याची सुरुवात व्यंकटराव हायस्कूल येथून होणार आहे. या मिरवणुकीत सजीव देखावे, मर्दानी खेळ, आतिषबाजी होणार आहे, अशी माहितीही विजयकुमार पाटील यांनी दिली.
दोन दिवस चालणाऱ्या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी आजरा तालुक्यातील व्यक्ती व संस्थांनी आर्थिक मदत करावी, तसेच लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष महादेव टोपले, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, विलास नाईक, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, संजय सावंत, आनंदा कुंभार, मनोज गुंजाटे, जितेंद्र शेलार, बंडा कातकर, गौरव देशपांडे यांच्यासह आजऱ्यातील नागरिक उपस्थित होते. मारुती मोरे यांनी आभार मानले.
======================
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment