Sunday, April 20, 2025

आजरा ग्रामीण रुग्णालय येथे मोफत डायलिसिस युनिटचा सोमवारी शुभारंभ

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय आजरा येथे मोफत डायलिसिस युनिटची उभारणी करण्यात आली आहे. या युनिटचा शुभारंभ आरोग्य मंत्री ना. आबिटकर यांच्या हस्ते सोमवार (दि. 21) रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

डायलिसिस सुविधेचा लाभ घेण्यासाठी आजरा तालुक्यातील रुग्णांना बाहेरगावी जावे लागत होते, त्यामुळं आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत असे. हीच बाब लक्षात घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री ना. आबिटकर यांनी आजरा ग्रामीण रुग्णालय येथे मोफत डायलिसिस सुविधा सुरु व्हावी, याकरिता विशेष प्रयत्न केले. ही सुविधा आता आजरा येथे सुरु झाल्यामुळे तालुक्यातील डायलिसिस रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. यातून रुग्णांचा पैसा व वेळ वाचणार आहे.

या सुविधेचा शुभारंभ सोमवारी सकाळी 10 वाजता आजरा ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य मंत्री ना. आबिटकर यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
================

No comments:

Post a Comment

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला

मुंबई, न्यूज नेटवर्क : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 101 व्या वर्षी त्या...