Thursday, December 18, 2025

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला मंच यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील "काळोख देत हुंकार" या नाटकाचा प्रयोग सादर केला. या नाटकातील श्रुती कांबळे यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले.

श्रुती कांबळे यांनी प्रथमच राज्य नाट्य स्पर्धेमध्ये काम केले आहे. त्यांनी नाटकाच्या प्रयोगात शिरमी हे मुख्य पात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले व नाटकाला दिशा दिली. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हे यश प्राप्त केले. या नाटकासाठी दिग्दर्शक म्हणून सुभाष विभुते यांनी काम केले. तसेच कलाकार (नरबा) अरमान दड्डीकर, (मुकादम) अनिकेत चराटी, (जुम्मण चाचा) कुमार नुलकर, (मामू) अभिजीत केसरकर, (भुत्या) संग्राम येरुडकर, (तानी) संचिता तर्डेकर, (हरकाम्या) विवेक कोंडुसकर यांनी देखील आपले काम चोखपणे पार पडले. नेपथ्य म्हणून आय. के. पाटील, मनीष टोपले, संगीत वामन सामंत, प्रकाश योजना रोशन कुंभार, तसेच रंगमंच व्यवस्था मंगेश तेऊरवाडकर, संतोष कुंभार, सुरज कुंभार, नामदेव सुतार, प्रसाद जोशी यांनी पार पाडले.
=====================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...