Wednesday, February 12, 2025

शुक्रवारी काळभैरी यात्रा; गडहिंग्लजमध्ये गुरुवारी पालखी सोहळा

गडहिंग्लज, विकास न्यूजसेवा :

महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गडहिंग्लज येथील काळभैरीची यात्रा शुक्रवार (दि. 14) रोजी होणार आहे. गुरुवार (दि. 13) रोजी सायंकाळी गडहिंग्लज शहरात पालखी सोहळा होणार आहे. या यात्रेची प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

काळभैरी यात्रेला अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे.  यात्रेच्या पूर्वसंध्येला रविवारी पालखी सोहळा होणार आहे. गडहिंग्लज  परिसरातील भाविकांकडून  पालखी सोहळ्यावेळीच काळभैरीचे  दर्शन घेण्याला प्राधान्य दिले जाते. पालखीवेळी सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. गडहिंग्लज शहरातून पालखी काळभैरीच्या डोंगरावर जाईल. रात्री बारा वाजता प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊन मुख्य यात्रेला प्रारंभ होईल. पहाटेपर्यंत मंदिरात वस्त्रालंकार, महाआरती व इतर विधी होणार आहेत. दुपारी बाराला सबिना फिरणार आहे. यात्रेदिवशी काळभैरी डोंगर भक्तांच्या गर्दीन फुलून जातो. यात्रेनिमित्त मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे या यात्रेची प्रशासनाकडूनही मोठी तयारी करण्यात आली आहे.
=======================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...