आजरा, विकास न्यूजसेवा :
आण्णा भाऊ आजरा सूत गिरणीचे संस्थापक कै. काशिनाथ चराटी आण्णा व कै. माधवराव देशपांडे भाऊ यांच्या जन्मदिन सप्ताहानिमित्त आजरा सूत गिरणी परीवारातील सदस्यांकरीता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोतन करणेत आले होते.
ई.एस.आय.सी सेवा दवाखाना शिनोळी व कागल यांचेमार्फत महाराष्ट्र शासनाने घोषीत केलेल्या १०० दिवसांचे कार्यक्रमा अंतर्गत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणेकरीता सूत गिरणीतील ई.एस.आय.सी चे सदस्य कामगार कर्मचारी यांचेकरीता आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करणेत आले होते. शिबीराचे उदघाटन सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी यांचे हस्ते करणेत आले. प्रास्ताविक संस्थेचे जनरल मॅनेजर अमोघ वाघ यांनी केले. संपूर्ण वस्त्रोद्योगाची वाटचाल अत्यंत अडचणीतून सूरू असताना आपल्या संस्थेच्या व्यवस्थापनाने मशिनरीं अॅटोमायजेशन व अपग्रेडेशन करणेचा निर्णय घेतला व टेक्नीकल टीम ने ही जबाबदारी लिलया पार पाडल्यामूळे सूताचा दर्जा सुधारला व उत्पादनामध्ये वाढ झालेमूळे सूत गिरणीस चांगले दिवस येतील अशी आशा निर्माण झाली आहे व कै. आण्णा व भाऊ यांच्या जन्मदिन सप्ताहाचे औचित्य साधून घेणेत आलेल्या या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त कामगारांनी घ्यावा असे आवाहन केले. शिबीरामध्ये ई.एस.आय.सी सेवा दवाखाना शिनोळी व कागल यांचेकडून ई पहचान कार्ड रजिस्ट्रेशन अपडेट करणे तसेच बी.पी. शुगर, सी.बी.सी तसेच इतर आजारांबाबत मार्गदर्शन करून आवश्यक ती औषधे कामगारांना देणेत आली. याप्रसंगी तज्ञ संचालक अनिकेत चराटी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणेत आल्या. सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी व व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांचे हस्ते कागल व शिनोळी येथील प्रमुख डॉक्टर अमितकुमार व डॉ. हर्शल यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला. कार्यक्रमास संचालक जयसिंगराव देसाई, हसन शेख, मनिषा कुरूणकर यांचेसह अधिकारी कृष्णाजी कुलकर्णी, राजेंद्र धुमाळ, आर.ए.पाटील दत्तात्रय दोरूगडे, शामली वाघ तसेच तानाजी पाटील व सूत गिरणीचे कामगार कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. शिबीराचे नियोजन व सुत्रसंचालन सचिन सटाले यांनी केले. आभार संचालक राजु पोतनीस यांनी मानले.
===============
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment