Thursday, February 13, 2025

15 फेब्रुवारी रोजी साळगाव येथे कबड्डी स्पर्धा

आजरा, विकास न्यूजसेवा :

साळगाव (ता. आजरा) येथील जय हनुमान कबड्डी संघ यांच्या वतीने एक गाव एक संघ 55 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी विठ्ठल-रखुमाई व हनुमान मंदिर शेजारील मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेसाठी 5001रु., 3001रु., 2001रु., 1001रु. अशी रोख रकमेची बक्षिसे व चषक विजयी संघांना मिळणार आहेत. त्याचबरोबर बेस्ट रायडर व डिपेंडर यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी हर्षद गजरकर - 9699620215, हर्ष भंडारी - 9405689368, तेजस थोरवत - 9699213573, करण पाटील - 9284543651 यांच्याशी संपर्क साधावा.
=======================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...