आजरा, विकास न्यूजसेवा :
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये रिक्त असलेल्या व्हा. चेअरमन पदावर सुभाष गणपतराव देसाई (रा. सिरसंगी ता. आजरा) यांची बिनविरोध निवड झाली. सदरची सभा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापुर यांचे प्रतिनिधी व्ही.एम.पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाईस चेअरमन पदासाठी सुभाष देसाई यांचे नांव माजी उपाध्यक्ष मधुकर कृष्णा देसाई यांनी सुचविले त्यास जेष्ठ संचालक विष्णु मोतबा केसरकर यांनी अनुमोदन दिले.
यावेळी जेष्ठ संचालक मुकुंदराव देसाई म्हणाले, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ एकमताने काम करीत असुन यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून कारखाना यशस्वीपणे चालविणेसाठी प्रयत्न राहतील असे सांगीतले. माजी व्हा. चेअरमन मधुकर देसाई यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ व संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी यांनी व्हाईस चेअरमन पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबददल आभार व्यक्त केले, नुतन उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी वेळ देवुन काम करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक उदयसिंह पोवार, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment